Monday, April 11, 2011

aarati

आरती 
लागे तुझा निजध्यास  निशिदिनी मनाला 
बळीराजाचा दास होऊनी दारी उभी तू दंड घेउनी 
तुझिया बटू रुपास करीतसे मी आरती 
प्रल्हादाला अभय देऊनी दैत्य मार्दिसी सिंह नखांनी 
तुझिया रुद्र रुपास करीतसे मी आरती 
सती रेणुका तू प्रकटोनी निक्षत्रीयची केलीस अवनी 
तुझिया परशु रुपास करीतसे मी आरती 
सीतामाई तू जय भुवनेश्वरी दुष्ट रावणा धूळ चारीली 
तुझिया रघु रुपास करीतसे मी आरती 
द्रौपदीची लाज राखिसी दुष्ट दुर्जना शासन करिसी 
तुझिया कृष्ण रुपास करीतसे मी आरती 
महाकाली तू महालक्ष्मी महासरस्वती विणावादिनी
तुझिया दिव्य रुपास करीतसे मी आरती