Tuesday, March 8, 2011

देवी करंजेश्वरी

अनेक कोकणस्थ लोकांची कुलस्वामिनी असून हिचे मुख्य स्थान गोवळकोट किल्ल्याच्या पायथ्याशी आहे .चिपळूण पासून जवळ असलेल्या गोवळकोट किल्ल्याच्या पायथ्याशी हिचे मुख्य स्थान  असून मंदिर  अतिशय सुंदर व निसर्ग रम्य परिसरात आहे .गोवळकोट किल्ल्यामध्ये रेडजाई देवीचे स्थान आहे .देवीच्या समोर सोमेश्वर महादेवाचे स्थान आहे .येथील शिमगा पाहण्या सारखा असतो.हि देवी एका आर्त भक्ताच्या हाकेने धाऊन आली व करंजीच्या झाडात प्रकट झाली म्हणून हिचे नाव करंजेश्वरी पडले .पटवर्धन सर्व लोकांची हीच कुलदेवता आहे .